Sunday, August 26, 2018

सिद्ध-साधकांचा सिद्धगड

Murbad taluka of Thane district has ancient history. Naneghat, built on the Satvahanas, is situated on its top, the Bihodanghad, the Pulusonale caves, Bhairamgad, Naldurg, Machchindra and Gorakhgad and Siddhagad. The ancient tradition of Murbad is a journey of Mhsa's traveler. Great revolutionary Hutatma Bhai Kotwal, who is patriotism and social life itself. Mumbai's architect Jagannath and Nana Shankarsheth, whose crescendo of values ​​have been linked to the nation, have their nails attached to Murbad. It is only if tourists have not stepped in to the Moorbad region, which preserved ancient history. Famous Siddhagad is one of them.

In 1942, during the freedom struggle against British, identity of Sadhagad which was celebrated by the sacrifice of martyr Bhai Kotwal and Martyr Hariji Goma Patil, was not new to Thane. Every year, on January 2, the patriotic citizens of Thane will regularly visit large numbers of people to greet the martyr's memorial. Due to the 'formless desperation that proves to be achieved,' as the form of the formation of the 'Sadhgad' enters the mind, the steps of brave and misleading youths are moving around. To reach Sadhagad, Thane-Murbad will come to Pune and go down the road from Mhsa-Dhasei. Or bus service is available directly from Kalyan. That bus should lift it. The Borwadi, which is 1400 feet high above sea level, is surrounded by a thick forest in the adjoining tribal village of Sahyadri. The Borwadi is well-suited to the Sadhagadas. By starting your vehicle in the village, you start to climb up to the fort. Siddhagad stands on the boundary of Pune, Thane and Raigad districts. Siddhagad Machi or Siddhagwadi, which is billed at the height of the Bhimashankar range in Sahyadri, is about 2 thousand feet tall. This is the first part of the fort. Then the pinnacle is the second part of the Citadel. It is a small escape from Sahyadri on the machi machina of Sadhagad and the height of 3236 ft high above the sea level is seen to be tapering in the sky like a two-storey chapar. As the Egyptian pyramid, which has been deliberately conceived on a grand scale, would be an insignificant spectacle of Siddhagad. But this aspect of this perspective will remain in it till it touches itself, because the actual progress of the path of progress, as you go above it, its radar formation becomes manifest. The front wall of the Sahyadri wall, and the deepening of the ground floor, is deeply missed by the pain of our pain. The magnificence and gravity of Sadhagad also sparks us and we get to see one-way dormant attraction. We are not surprised that the tradition of hundreds of years of this attraction is still on the primate nature of Siddhagad. On the fort, Shivling, Nandi, Ganapati Kartikeya, and Devdita of Shivapirivara, and remember the unidentified bundle of Satishal and Veeragal fort.

From the base of Sadhagad, Raneve wore a wreath, and the face of the sweat was covered with dusty face in two and a half hours and you came to the first entrance. It was astonishing at the place where the strong and still still in a well-arranged chimney door and the landscaped area. We face a square trunk with a four-stroke spread around it, and the middle of the middle of the day has been challenged by the glory of the sidewalk. At its base, the ancient temple of Shri Narmatadevi attracts attention in the tree plantation. Inside there is the goddess rice. When you come to the Siddhagadwadi with his presence, it is a great shock. Saggad village with a threshold of only twenty-five-thirty houses is very tall and self-sufficient even though in the reading. Evergreen forests, pleasant air, elementary school, recent village power, abundant water, Due to the wealth of agriculture and forest, all the basic needs of the villagers are based on this because they do not have much connection with the modern world. The idol of Lord Shiva is from the Koli tribe and lives in Hemade, Ghige, Wadekar, Yaande, Kokate and Bhawari families. People are happy and futile. Until 2004, there was a fourth school of the Zilla Parishad. She has been transformed into Vastashal, Tanaji Maruti Hemade of Siddhagad Wadi is working as a teacher. A natural disaster occurred on 26 and 29 July 2005, in a self-reliant and independent village, when the entire Konkan region was filled with heavy rain. The blacksmith wall shook the fort With the thundering of thorns, some parts of the southern part of Siddagad and the vast edges of the Sahyadri collapsed, along with large trees, and the debris of stone and soil changed the character of river in the valley. This led to the collapse of the world with the people of the Sadhagad. But after this catastrophic catastrophe, the villagers immediately got restored and they did not break the nerve associated with the nostrils, which preserved thousands of years of tradition when they started a new life.

With a little rest in the village, we start climbing the cottage. Small steps appear in many places in difficult vertical areas, and small steps are sculpted in many places. With an acute difficulty, you get to the top of the citadel around an hour. The mound of the citadel is narrow and east-west is miles away and the actual length of the cottage wall is 75 feet by 245 feet. Under the open sky on the fort, there is a river named Shambhuhamidev Pindi and it is a Nandi that keeps the eye fixed from time immemorial. As you move towards the west, there is a command, the chawls and broken remains of the house are scattered in it. Also, when you reach the west end, the remains of the bastion are seen. The fortification of the fort is completely extinct. It is best to see the fort with a sharp cross and a strong wind from below. There is plenty of water on the fort. There are many water bodies scattered in the rock. Taking advantage of the breakfast brought together, take a look at the surroundings. Many forts come in the stage of our eyes. Bhimashankar, Padargad, Dakabheri, Rajmachi, Paithali Jambhurde Dam, Kothalgad, and beyond the scenic beauty of Manikgad, Karnala, Matheran, Prabalgad, Peab, Malgad, northwest, Mahuli, Gorakhgad to the north, and the Durgakkal ranges from Machchindragad to Bhimashankar rang.

On the basis of Sahyadri tariffs, Shivaji Maharaj established Swarajya by using the 'Guinima Kaava' war strategy. Using the same technique, the revolutionaries defeated the British. Actor revolutionary Vasudev Balwant Phadke took refuge in a dense forest in Prabalgad and Karnala fort area. The graduate youth of Jahalwadi revolutionary Bhai alias Vitthalrao Laxmanrao Kotwal, after being inspired by the announcement of 'Karanjh Marge' in 1942, will be replaced by the revolutionary youth, by breaking the railway track, cutting the telephone, throwing the electric pole, transforming transformers into liberal work, On the occasion, he would be facing death. While doing that, they had to take shelter in this Sahyadrita Sahagadri. Sahyadri gives 'inspiration for freedom', but rowdy and fraudulent diseases kill society. On 2 January 1943, the British official surrounded the Siddhagad in Fatehabad and started firing on the revolutionaries. Hariji Patil became martyr in this. Bhai Kotwal's body was painted. When the British approached, they had a few strings. Crucifixion halted their head with a gun and choked them. Brother Kotwal smiled and smiled on the altar of independence and became immortal. Today, martyrdom monument is standing in a stream of Borwadi on the south side of Siddhagwadi. Let's take a glimpse of it and go back to the journey by submitting to the sudagad. Brother Kotwal smiled and smiled on the altar of independence and became immortal. Today, martyrdom monument is standing in a stream of Borwadi on the south side of Siddhagwadi. Let's take a glimpse of it and go back to the journey by submitting to the sudagad. Brother Kotwal smiled and smiled on the altar of independence and became immortal. Today, martyrdom monument is standing in a stream of Borwadi on the south side of Siddhagwadi. Let's take a glimpse of it and go back to the journey by submitting to the sudagad.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. सातवाहनांनी निर्मिलेला नाणेघाट, त्याच्या माथ्यावरील जीवधनगड, पुलूसोनाळे लेणी, भैरमगड, नलदुर्ग, मच्छिंद्र व गोरक्षगड आणि सिद्धगड अशी ऐतिहासिक स्थळे आहेत. मुरबाडची प्राचीन परंपरा जपणारी म्हसाची यात्रा आहे. देशप्रेम व सामाजिक जीवनात स्वत:ला झोकून देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आहेत. देशाची मान जगभर उंचावणारे मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांची नाळ मुरबाडशीच जोडली आहे. असा प्राचीन ते अर्वाचीन इतिहास जपणाऱ्या मुरबाड भूमीकडे पर्यटकांची पावले न वळली तरच नवल. सुप्रसिद्ध सिद्धगड हा त्यापैकीच एक.

१९४२ साली ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील या क्रांतिवीरांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडाची ओळख ठाणेकरांसाठी नवी नाही. दरवर्षी २ जानेवारीला येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यास आजुबाजूच्या परिसरातील व ठाण्यातील देशभक्त नागरिक नियमितपणे मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. 'असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा' देणाऱ्या सिद्धगडाचे उत्तुंग रांगडे रूप मनाला भुरळ घालीत असल्यामुळे गिरीभ्रमण व दुर्गभ्रमण करणाऱ्या साहसी युवकांचीही पावले हमखास इकडे फिरकत असतात. सिद्धगडावर जाण्यासाठी ठाणे-मुरबाड एसटीने व तेथून म्हसा-धसईमार्गे उचले गावी येऊन पायउतार व्हावे. किंवा कल्याणहून थेट धसई बससेवा उपलब्ध आहे. त्या बसने उचले गावी यावे. समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंच असलेले बोरवाडी हे अवघ्या पंधराएक उंबरठ्याचे आदिवासी गाव सह्याद्रीच्या ऐन कुशीत घनदाट जंगलाने वेढलेले आहे. बोरवाडी सिद्धगडाला अगदी खेटून आहे. आपले वाहन गावात ठेवून गड चढावयास सुरुवात केली की, तासाभरात आपण गडावर दाखल होतो. सिद्धगड हा पुणे, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर उभा आहे. सह्याद्रीतील भीमाशंकर रांगेच्या उभ्या भिंतीला बिलगून असलेली सिद्धगडाची माची किंवा सिद्धगडवाडी सुमारे दोन हजार फूट उंच आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला भाग. माचीवरील प्रवेशद्वार ओलांडले की, मग सुरू होतो शिखरमाथा म्हणजे बालेकिल्ल्याचा दुसरा भाग. सिद्धगडाच्या माचीवर सह्याद्रीपासून किंचित सुटलेला आणि समुद्रसपाटीपासून ३२३६ फूट उंच असा हा बालेकिल्ला घराच्या दोन पाकी छपरासारखा आकाशात निमुळता होत गेलेला दिसतो. जणू विशालकाय चौरंगावर अलगदपणे आणून ठेवलेला इजिप्तचा पिरॅमिड वाटावा तसे दुरून सिद्धगडाचे विलोभनीय दर्शन होते. परंतु त्याचे हे देखणे रूप त्याच्याजवळ जाईपर्यंतच टिकते, कारण प्रत्यक्ष सिद्धगडावर चढाई करीत जसजसे आपण वर जावे, तसतसे त्याचे रौद्रभीषण स्वरूप समोर येत जाते. समोरची सह्याद्रीची उंच कातळ भिंत आणि तळकोकणातील वाढत जाणारी खोल दरी पदोपदी आपल्या काळजाचा ठोका चुकवीत असते. सिद्धगडाची भव्यता आणि भीषणताही आपल्याला स्तिमित करते व आपसूकच त्याच्याबद्दल एकप्रकारे भीतीयुक्त सुप्त आकर्षण वाटू लागते. या आकर्षणापायीच शेकडो वर्षांची परंपरा जपणारी आदिम संस्कृती सिद्धगडावर अद्याप सुखनैव नांदते आहे, याचे मग आपल्याला आश्चर्य वाटत नाही. गडावर शिवलिंग, नंदी, गणपती कार्तिकेय आणि शिवपरिवारातील देवदेवता तसेच सतीशिळा व वीरगळ गडावरील अज्ञात झुंजीची आठवण करून देतात.

सिद्धगडाच्या पायथ्यापासून रानेवने पालथी घालत, घामाच्या धारात धुळीने माखलेला चेहरा पुसत अडीच-तीन तासांत डोंगर चढून आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी येतो. या ठिकाणी मजबूत आणि अद्यापही सुस्थितीत असलेला चिरेबंदी दरवाजा आणि त्यापलीकडचा निसर्गसंपन्न परिसर पाहून मन थक्क होते. आपल्यासमोर चहूबाजूने पसरलेली घनदाट झाडी आणि त्याच्या मधोमध काळाकभिन्न कातळ भिंतीचा गगनावेरी गेलेला सिद्धगडाचा शिखरमाथा आव्हान देत उभा ठाकतो. त्याच्या पायथ्याशी दाट वृक्षराजीत श्री नारमातादेवीचे प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेते. आत देवीचा तांदळा आहे. तिचे दर्शन घेऊन आपण सिद्धगडवाडीत येतो, तेव्हा सुखद धक्का बसतो. अवघ्या पंचवीस-तीस घरांचा उंबरठा असलेला सिद्धगड गाव अतिशय उंच आणि आडरानात असूनसुद्धा स्वयंपूर्ण आहे. सदाहरित वनराई, आल्हाददायक हवा, प्राथमिक शाळा, अलीकडेच गावात आलेली वीज, मुबलक पाणी, शेती आणि जंगल संपत्तीमुळे गावकऱ्यांच्या साऱ्या मूलभूत गरजा इथेच भागत असल्याने त्यांचा आधुनिक जगाशी फारसा संबंध येत नाही. इथली आदिम वस्ती महादेव कोळी जमातीची असून येथे हेमाडे, घीगे, वडेकर, यंदे, कोकाटे, भवारी या आडनावांची कुटुंबे राहतात. लोक सुखी-समाधानी आणि अगत्यशील आहेत. २००४ पर्यंत येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा होती. तिचे रूपांतर वस्तीशाळेत केले असून सिद्धगड वाडीतील तानाजी मारुती हेमाडे हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. अशा या स्वावलंबी, स्वतंत्र वृत्तीने जगणाऱ्या गावावर २६ ते २९ जुलै २००५ साली नैसर्गिक प्रकोप झाला, त्यावेळी संपूर्ण कोकणातच अतिवृष्टीने थैमान घातले होते. त्या काळरात्री धरणीकंप व्हावा तसा गड हादरला. कानठळ्या बसविणारा कडकडाट करीत सिद्धगडाच्या दक्षिणेकडील काही भाग व पूर्वेकडील सह्याद्रीचा प्रचंड कडा, त्यावरील मोठमोठ्या झाडाझुडुपांसहीत खाली कोसळला आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्याने दरीतील नदीचे पात्र बदलले. यामुळे सिद्धगडावरील लोकांचा जगाशी असलेला संपर्क तुटला. परंतु या विलक्षण आपत्तीनंतर गावकरी लगेच सावरले आणि त्यांनी नव्या उमेदीने जीवनक्रम सुरू करताना हजारो वर्षांची परंपरा जपणाऱ्या या आकाशातील घरट्याशी जोडली गेलेली नाळ तुटू दिली नाही.

गावात थोडी विश्रांती घेऊन आपण बालेकिल्ला चढावयास सुरुवात करतो. उभ्या कातळात अवघड जागी लहानखुऱ्या पायऱ्या अनेक ठिकाणी खोदलेल्या दिसतात. या बिकट वाटेने सावकाश तोल सावरत आपण तासाभरात बालेकिल्ल्याच्या माथ्यावर येतो. बालेकिल्ल्याचा माथा अरुंद आणि पूर्व-पश्चिम पाव मैल लांब असून प्रत्यक्ष बालेकिल्ल्याची लांबी-रुंदी ७५ फूट बाय २४५ फूट आहे. गडावर पडक्या मंदिरात उघड्या आभाळाखाली शंभूमहादेवाची पिंडी आणि त्यावर अनादी काळापासून नजर स्थिर ठेवून बसलेला नंदी आहे. तेथून पश्चिमेकडे जाताना कमान दिसते, तिच्या आत घरांचे चौथरे व भग्न अवशेष विखुरलेले दिसतात. तसेच पश्चिम टोकाशी आल्यावर बुरुजाचे अवशेष पाहावयास मिळतात. गडाची तटबंदी पूर्णपणे नामशेष झाली आहे. चहूबाजूने तुटलेला भेदक कडा आणि खालून वर येणारा जोरदार वारा यामुळे कड्यापासून अंतर ठेवूनच गड पाहावा हे उत्तम. गडावर मुबलक पाणी आहे. खडकात खोदलेली अनेक जलकुंडे येथे आहेत. सोबत आणलेल्या न्याहरीचा आस्वाद घेता घेता भोवताल निरखावा. अनेक किल्ले आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात. भीमाशंकर, पदरगड, ढाकबहेरी, राजमाची, पायतळी जांभुर्डे धरण, कोथळागड, त्यापलीकडे माणिकगड, कर्नाळा, माथेरान, प्रबळगड, पेब, मलंगगड, वायव्य दिशेला माहुली, उत्तरेला गोरखगड, मच्छिंद्रगड ते भीमाशंकर रांगेतील दुर्गाकिल्ल्यांपर्यंतचा रम्य परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या आधारे शिवाजी महाराजांनी 'गनिमी कावा' या युद्धतंत्राच्या कौशल्याने वापर करून स्वराज्य स्थापिले. तेच तंत्र वापरून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हैराण केले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी प्रबळगड आणि कर्नाळा किल्ला परिसरातील घनदाट जंगलाचा आश्रय घेतला होता. तर १९४२च्या 'चले जाव'च्या चळवळीत 'करेंगे या मरेंगे' या घोषणेची प्रेरणा घेऊन जहालवादी क्रांतिकारक भाई उर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल या पदवीधर युवकाने क्रांतीदल स्थापन करून रेल्वे रुळ उखडणे, टेलिफोनच्या तारा कापणे, विजेचे खांब पाडणे, ट्रान्सफॉर्मर उडविणे ही कामे जिवावर उदार होऊन, प्रसंगी मृत्यूला सामोरे जाऊन केली. ती करीत असताना सह्याद्रीतील या सिद्धगडाचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. सह्याद्री 'स्वातंत्र्याची प्रेरणा' देतो, मात्र दगाबाजी व फितुरीचा रोग समाजाचा घात करतो. येथेही फितुरीमुळेच सिद्धगडाला २ जानेवारी १९४३ला ब्रिटिश अधिकारी हॉल याने वेढा घातला व क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू केला. त्यात हिराजी पाटील हुतात्मा झाले. भाई कोतवाल यांच्या शरीराची चाळण झाली. ब्रिटिशांनी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा त्यांच्यात थोडी धागधुगी होती. क्रूरकर्मा हॉलने त्यांच्या डोक्याला बंदूक लावून चाप ओढला. भाई कोतवाल हसत-हसत स्वातंत्र्याच्या वेदीवर चढले व अमर झाले. आज सिद्धगडवाडीच्या दक्षिण बाजूला बोरवाडीतील एका ओढ्यात हुतात्मा स्मारक उभे राहिले आहे. त्याचे दर्शन घ्यावे आणि सिद्धगडाला मानाचा मुजरा करून परतीच्या प्रवासाला निघावे.

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.