Shivaji Maharaj Navy, Thane Creek and Portuguesa
Shivaji Maharaj Navy, Thane Creek and Portuguesa
Shivaji Maharaj's Navy was in Kalyan. Their ship was coming from Thane creek to Dabhol, Ratnagiri, Rajapur and Karwar. Many people have asked me whether Chhatrapati Shivaji Maharaj's post has been made in Thane city or not. If history does not make such an answer. There is no concrete or written evidence available yet for Shivaji Maharaj's footsteps. The ancient waterway of the Thane creek is just like the Highway. Who would go unrecognized at this side of the road without a reason? The war veteran of ancient times was changing in Shivaji times. In spite of this, the protection of each other's bounds, filing or reconciliation agreement was done with the consent of each other.
History is being witnessed today by Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Swarajya, Thane city, but the history has changed in this regard, but Shivaji Maharaj should have put the entire country back to the eastern part of the country before he inaugurated Swaraj's first defense. Because the fate of the Shivaji Maharaj was in the public interest. Mainly, they had accurate information about the boundaries of the state and the geographical location of the enemy. Maharaj's account was very cautious. So if Afzal Khan was slaughtered, or he was surrounded by Panhalgad, whether in the palace of Lal Mahal, who was scared of the Shahistakhana, be set free from Agra. In all these places, he has carefully studied his plans and took the time to complete his life. After winning Kalyan on 24th October 1657, he studied the sideways in the sea in the Sashti alias Thane area. At the time of trade, the Portuguese caravans were in the vicinity of Thane. They started separating cottons and spreading arms and ammunition. Shivaji Maharaj started the factory of Marine vessels by constructing Durgadi Fort with the intention of intrinsically searching for the underprivileged people of Portuguese and English. The ships of different sizes such as Tarandi, Tarave, Shibade, Guarba, Pagara, Tirkathi, Machva, Pal, Sangamiriya and Fattharai began to be prepared from this dock.
Besides Kalyan, Bhiwandi also entered Swarajya. Bhiwandi means the classical textile industry. From the ancient times, the handmade fabric made on handloom was used to go to the other side of the road by way of waterways and sophistication, besides the creation of agricultural equipments, the country came from being a foreign trade and Bhiwandi city was flourishing. Shivaji Maharaj deployed the convoy of Bhiwandi near Bhiwandi's Bhui Kota for the protection of Bhiwandi by repairing Kamvari creek in Bhiwandi, and then taking care of it in Bhiwandi harbor. On August 16, 1659, the governor of Thane-Vasai, Francisco-de-Melo-e-Castro and Antonia-de-Saza Kutinho, in his letter to his king, said that the son of Shahidaji of Adilshah has won the seat near Chauhal, Kalyan, Bhiwandi , Armada and the army are decorated in Panvel. So we have instructed our captains to intercept their ships. ' Shivaji Maharaj's Armory Ships are narrow and nullah part because of the lengthy tapering of the water. FEATURES On 1 November 1679, the British Captain wrote to the Governor of Mumbai, 'The enemies of Shiva (Shivaji Maharaj) went away easily from our front. Our power does not go in front of them, because these small boats make us rush easily and incredibly. '
Before Shivaji Maharaj's birth one hundred years S In 1533, the Portuguese occupied the entire west coast and imposed upon them the ships that went through their territories, according to their orders. Though the river of Aramara of Shivaji, the Thakur sat on the foreign power, while going through the Thane creek, they were given a carpet to the Portuguese. Only then do they have permission to move forward. Was it surprised to hear this? But this fact was true when it was. Shivaji Maharaj was a wise and far-thinking person. The Portuguese came with the intention of trading. They should trade, and goods are beneficial for both. The Portuguese built the fort with the Thaksi, and they set up the fortresses. Maharaj had noticed. They wrote a letter to their leaders and officials. Capricorn is not like Savarkar.
'The people of Firangi and English and Valdese and Pharasis and Dingmaraad capi also make money, but it is not like' Varakad Savarkar '. Every state has its food. People of this discourse by their order come from the province. What are the things that the ruling class does not have? However, the state of Tapirakas should be entered, the state should be increased, the respect of the dignity of the dignity of the respective places, accordingly, the works of the places are gone; Do not let your hands drop off from the site. He should have given as much support as he had received. They should not always give them only always. Generally, people should not know that they should be sent to Janjira. If the space is given to the warehouse, then the seafarers should not be given to the sea by the sea, as long as the place is in place, there are limits to it.
शिवरायांचे आरमार, ठाण्याची खाडी व पोर्तुगीज
शिवाजी महाराजांचे आरमार कल्याणला होते. त्यांची आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ठाणे नगरीला झाला आहे की नाही, असा प्रश्न अनेकजण मला विचारत असतात. इतिहासाला जर तर असे उत्तर देता येत नाही. शिवाजी महाराजांचे ठाणे नगरीत पाऊल ठेवण्याबद्दल कोणताही ठोस वा लिखित पुरावा अद्यापतरी उपलब्ध झालेला नाही. ठाण्याची खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे अगदी हमरस्ताच. या रस्त्याच्या कडेला असलेल्या अनोळखी घरांमध्ये कारण असल्याशिवाय कोण घुसेल? प्राचीन काळातील युद्धनिती शिवकाळात बदलू लागली होती. असे जरी असले तरी एकमेकांच्या सीमांचे रक्षण, तहनामे वा सामंजस्य करार एकमेकांच्या संमतीने होत असत.
आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ठाणे नगरीला झाला की नाही, याबाबत इतिहास मूग गिळून आहे, परंतु कल्याणला खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जातीने हा सारा खाडी प्रदेश पालथा घातला असला पाहिजे. कारण नियोजनपूर्ण कार्य करण्याची शिवरायांची हातोटी लोकविलक्षण होती. मुख्य म्हणजे त्यांना आपल्या राज्याची सीमा आणि शत्रूच्या भौगोलिक स्थानाची अचूक माहिती होती. महाराजांचे हेर खाते अतिशय दक्ष होते. त्यामुळे मग अफझलखानाचा वध असो, पन्हाळगडाचा वेढा असो, लाल महालात शाहिस्तेखानाची फजिती केलेली असो, आग्राहून सुटका असो, किंवा दोन वेळा सुरतेची बेसुरत करून स्वराज्यात आणलेली बेसुमार संपत्ती असो वा दक्षिणदिग्विजय असो. या सर्व ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्वक योजना आखून प्रसंगी स्वत:चा जीव पणाला लावून कार्य तडीस नेले आहे. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण जिंकल्यानंतर साष्टी उर्फ ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग त्यांनी अभ्यासपूर्वक पाहिले. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या दर्यावर्दी पोर्तुगीजांच्या वखारी त्यावेळी ठाण्याच्या खाडीकिनारी होत्या. वखारीच्या आडोशाने त्यांनी स्वतंत्रपणे कोटकिल्ले बांधून हातपाय पसरविण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व इंग्रज या बेरकी व धूर्त लोकांचा अंतस्थ हेतू दूरदर्शीपणे हेरला आणि कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून आरमारी जहाजांचा कारखाना सुरू केला. या गोदीतून तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तीरकाठी, मचवा, पाल, संगमिऱ्या आणि फत्तेमाऱ्या अशा निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजे तयार होऊ लागली.
कल्याणबरोबरच भिवंडीही स्वराज्यात दाखल झाली. भिवंडी म्हणजे वस्त्रोद्योगाची पंढरी. प्राचीन काळापासून हातमागावर तयार झालेला तलम कपडा जलमार्ग व खुष्कीच्या मार्गाने भारताच्या कानाकोपऱ्यात जात असे, शिवाय शेतीविषयक अवजारांच्या निर्मितीमुळे येथून देश विदेशाशी व्यापार होऊन भिवंडी शहर भरभराटीला आले होते. भिवंडीला कामवारी खाडी वळसा मारून नागला कोटाजवळ ठाण्याच्या खाडीला मिळत असल्यामुळे शिवाजी महाराजांनी भिवंडीच्या रक्षणासाठी भिवंडीच्या भुई कोटाजवळ जहाजांचा काफिला तैनात करून त्यांची देखभाल व दुरुस्तीही भिवंडीच्या बंदरात सुरू केली. याची माहिती १६ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रॅन्सिस्को-द-मेलो-ए-कस्ट्रो आणि अँटोनिया-डी-सोझा कुतिन्हो या ठाणे-वसईच्या गव्हर्नरांनी आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आदिलशहाचा सरदार शहाजी याच्या मुलाने वसई, चौलजवळचा प्रदेश जिंकला असून कल्याण, भिवंडी, पनवेल येथे आरमार व सैन्य सजविले आहे. म्हणून आम्ही आमच्या कप्तानांना हुकूम देऊन ठेवला आहे की त्यांच्या गलबतांना अटकाव करा.' शिवाजी महाराजांची आरमारी जहाजे ही अरुंद व नालेचा भाग लांबलचक निमुळता असल्यामुळे पाणी सहजपणे कापीत चपलतेने पुढे जात. वेगवान हालचाली हे आरमाराचे वैशिष्ट्ये. त्याबद्दल १ नोव्हेंबर १६७९ रोजी इंग्रज कप्तान मुंबईच्या गव्हर्नरला लिहितो, 'शत्रूची (शिवाजी महाराजांची) गॅलव्हेटस आमच्या समोरून सहज निघून जातात. आमच्या शक्ती त्यांच्यापुढे चालत नाही, कारण या लहानशा होड्या आम्हाला सहज व आश्चर्यकारकपणे चकवतात.'
शिवाजी महाराजांच्या जन्माआधी शंभर वर्षे इ. स. १५३३ला पोर्तुगीजांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर कब्जा करून आपल्या हुकूमाप्रमाणे त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांवर त्यांनी जबर कर बसविला होता. शिवरायांच्या आरमाराचा दरारा, धाक परकीय सत्तेला बसला असला तरी ठाणे खाडीतून जाताना त्यांच्या जहाजांना पोर्तुगीजांना कारटेज (जकात) द्यावा लागे. तरच त्यांना पुढे जाण्यास परवानगी मिळे. हे वाचून ऐकून आश्चर्य वाटले ना? पण ही वस्तुस्थिती तेव्हा होती खरी. शिवाजी महाराज धोरणी आणि दूरदृष्टीने विचार करणारे होते. पोर्तुगीज व्यापाराच्या उद्देशाने आले होते. त्यांनी व्यापार करावा, वस्तूंची देवघेव दोघांनाही फायदेशीर आहे. पोर्तुगीजांनी ठाणेकिनारी वखारी बांधल्या व त्या आडोशाने गढी चौक्याही उभ्या केल्या. हे महाराजांच्या लक्षात आले होते. त्यांनी आपल्या सरदारांना, अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. टोपीकर वरकड सावकारासारखे नव्हेत.
'साहुकारांमध्यें फिरंगी व इंग्रज व वलदेज व फराशीस व डिंगमारादि टोपीकर हेही लोक साहुकारी करितात, परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्येक राज्यच करीत आहेत. त्यांचे हुकूमाने त्याचे होत्साते हे लोक या प्रांती साहुकारीस येतात. राज्य करणारास स्थळलोभ नाही असें काय घडों पाहतें? तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमतें प्रतिष्ठावीं हा पूर्णाभिमान, तदनुरूप स्थळोस्थळीं कृतकार्य हि जाले आहेत, त्यास हि हट्टी जात; हातास आलें स्थळ मेल्याने सोडावयाचे नव्हेत. यांची आमदरफ्ती आले गेले इतकीच आसूं द्यावी. त्यास केवळ नेहमी जागां कधीं हि देऊं नये. जंजिऱ्यासमीप तों या लोकाचें येणें जाणें सहसा होऊं देऊं नये. कदाचित वखारीस जागा देणें जाली तर खाडीचे मोबारी समुद्र तीरीं न द्यावी, तसेंच ठिकाणी जागा जोपर्यंत आपले मर्यादेने आहेत तो आहेत, नाहीं ते समयीं आरमार, तोफा, दारूगोळी हेच त्यांचे बळ आरमार पाठींशी देऊन त्याचे बळें त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेव्हां इतकें स्थळ राज्यांतून गेलें. याकरितां जागा देणेंच लांब खाडीगांव दोन गांवे राजापुरीसारखी असेल तेथे फराशिरास जागा दिल्हा होता या त्याचें दोन च्यार नामांकित थोर शहरें असतील त्यामध्यें जागा द्यावा. तो असा की तीच जागा शहराचे अहारीं. शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारा घालाव्या, त्यास इमारतींचे घर बांधू देऊ नये. या प्रकारें राहिले तर बरे, नाही तर याविणें प्रयोजन नाहीं. आले गेले असून त्यांचे वाटे आपण न जावें. आपले वाटे त्यांणीं न जावें इतकेंच पुरे.' (इतिहासमंजरी)
No comments:
Post a Comment
Please do write your suggestions and thoughts.