Sunday, September 2, 2018

City and Thane Satyagrahi in the fort

City and Thane Satyagrahi in the fort

How fast the Thane border is getting tumbled? Once upon a time north of the city of Konkan, Sahyadri was on the eastern shore of Konkan, Arabian Sea on the west, Savitri river to the south and Damanganga river on the north. In 1869, the British made two blocks in this area, Colaba and Thane. Later in 1883, Panvel and Uran in Thane were added to the district. After this, Kurla and Bandra from Mulund were included in Mumbai. After the United Maharashtra fight, the Thane region was handed over to Gujarat by Sanjan, Damanganga, and now the middle of Thane has two districts like Palghar and Thane. Although the geography of Thane has changed, it is the same history that happened on this land. How to change it? Therefore, till yesterday, we will visit a fort on the bank of river Damanganga, which is part of Thane.

The railway from Mumbai is 168 km away, and 135 km from Thanh, Ahmedabad Highway, is a fort of Daman. If you own a vehicle, you can come back after seeing a fort in one day and travel too funny. Tukkagad of Vasai on the left side of the road, and the left hand manor, surrendering the Ashrirag to Mahalaxmi of Dahanu, to Ballalgad in Talasir, to the left bank of the river, and to enter Gujarat. From here on the other side, near Bhilad and on the left side of Jharganga, on the left side, towards Daman, on the road showing Thane-Pardi village gate, it first got attracted towards Daman. In the surroundings of the whole green house, there are occasional small houses, surrounded by colorful flowers, fruitful garden surrounded by flora, and trees covered with trees, trees and trees in the courtyard, harvested rice cows, cattle and cattle, recently harvested paddy fields In it, there is a flutter of sparrows and scabs to extract the grains in the forest Nayanbhara nature comes with you to Naval Pardi, Bhamati, Palithe, Damanwada, Jumri, Daman-Camp. Daman's check post is also very beautiful. The lily-looking face is standing to welcome you with a lily-colored necklace in the middle of the entrance, a bunting box in the middle of the entrance. This gate was rebuilt on December 19, 1997.

Daman Campam is a well-known fort of Daman. From Thane-Pardi to the tar road, there will be a splendor. On the right side, Paleikad Nani is visited by Damanam by the side of the fort, while the road along with it goes directly towards Daman Fort. During the medieval period, all the services of the Portuguese came from the fort of Daman and many government slaves are still in thick fort in Daman. Motydmani means big captive. In Gujarat, the big and the poor are called Nani Daman. This fort is very strong. With the exception of one or two buildings, the three-three-and-a-half-year buildings do not stand alone, but it still has to be done today. There are churches in it. There is a lot of facilities for electricity, roads and water for hospitals, schools, colleges, collector offices, municipal offices, pollution control offices, museums and gardens. There are also shops, hotels. There is no city in the fort but it is a city in the fort. People come from country and abroad to see it. It can be seen that the entrance to this fort can be hit by a gun shot in three thousand square meters of length, and in view of this huge ten bastions and strong entrances to the south and north facing the fort, there are small festivals, crevices, fortified fortifications, and the absence of this fort can be seen. The wide, stainless steel road under your feet goes through the entrance, from which cars, cars, cars, motorbikes, motorcycles, auto rickshaws etc. are started. On the entrance door, there are big toked nails on the iron belt, in which the upper part of the nails is written in bold, on a long wide iron plate, with AOS 5 DMAIO DE 1789 ROZESTA PORTA. Madhoomatha Nakshidar is the gateway at the entrance and it has been closed. There is an inscription on the right side of the Portuguese empire and on the left side there is the inscription on the Guavas. E S The fort was built between 1581 and 1584. But before the fort was built, the port of Daman was ruled by the kingdom of Gujarat. Etc. S In the year 1523, the Portuguese had asked permission to trade with Shah. Shahshahi S In 1529, the Portuguese attacked the port on the port, and the fort was built to protect the port. The Portuguese S From 1529 to 1559, there were numerous attacks. Finally, Governor Constanta D. Braganza (AD 1558-1561) attacked Daman with about 3000 soldiers and 100 warships, but at this time there was no one to oppose him. The people had left Daman for fear of the Portuguese. So the Port and the fort came under the possession of the Portuguese without losing any of the soldiers. Governor Braganza took the fort to Daman's fort and built a new fort. Before going to Goa, he appointed the leader of the Democratic Republic of Congo Diogo da Nahrona Major for Dam and 1200 soldiers under his control. Etc. S Since the fort was built in 1584, the Portuguese continued to maintain the maintenance and maintenance of the fort till the 1961 Goa Liberation Movement. Today, the thick Daman Fort, with its modernity and historical context preserved its beauty,



किल्ल्यातील शहर आणि ठाण्याचे सत्याग्रही

ठाण्याच्या सीमा किती झपाट्याने अंकुचित होत आहेत. एकेकाळी उत्तर कोकणची राजधानी असलेल्या श्रीस्थानक ठाण्याच्या सीमा पूर्वेकडे सह्याद्री, पश्चिमेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे सावित्री नदी आणि उत्तरेकडे दमणगंगा नदी या चतु:सीमांनी व्यापलेल्या होत्या. इंग्रजांनी १८६९ साली या भूभागाचे कुलाबा आणि ठाणे असे दोन जिल्हे केले. त्यानंतर १८८३ साली ठाण्यातील पनवेल व उरण कुलाबा जिल्ह्याला जोडले. त्यानंतर मुलुंडपासून कुर्ला, बांद्रा हे मुंबईत समाविष्ठ झाले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर संजाण, दमणगंगापर्यंतचा ठाण्याचा प्रदेश गुजरातला बहाल केला, आणि आता तर ठाण्याची मधोमध शकले होऊन पालघर व ठाणे असे दोन जिल्हे झाले आहेत. परंतु ठाण्याचा भूगोल आता बदलला असला तरी या भूभागावर घडलेला इतिहास तोच आहे. तो बदलणार कसा? म्हणूनच कालपर्यंत ठाण्याचा भाग असलेल्या दमणगंगा नदीकाठावरील एका किल्ल्यातील शहराला आज आपण भेट देणार आहोत.

मुंबईपासून रेल्वेने १६८ किमी तर ठाण्यापासून अहमदाबाद हायवेने १३५ किमी अंतरावर दमणचा किल्ला आहे. स्वत:चे वाहन असेल तर एका दिवसात किल्ला पाहून परत येता येते आणि प्रवासही रमतगमत मजेशीर होतो. वाटेत उजव्या बाजूला वसईचा टकमकगड तर डाव्या हाताला मनोरचा आशेरीगड मागे टाकत डहाणूच्या महालक्ष्मीला दंडवत घालीत, तलासरीच्या बल्लाळगडाला डावी बगल देत मजल दरमजल करीत लाट तथा गुजरातमध्ये प्रवेश होतो. तेथून थोड्या अंतरावर भिलाडच्या पुढे आणि झारीगांवाच्या अलीकडे डाव्या बाजूला दमणकडे ही पाटी दाखविणाऱ्या रस्त्याने ठाणे-पारडी गावाच्या वेशीपाशी आलो की प्रथमदर्शनीच दमणकडे आकृष्ट होतो. भोवताल सारा हिरवाईने नटलेला, त्यात अधूनमधून दिसणारी लहान-मोठी घरे, घरांभोवती रंगबिरंगी फुलांनी, फळभाज्यांनी बहरलेली बाग, झाडाझुडपांतून पक्ष्यांनी घेतलेली मंजूळ तान, खळ्यात आणि अंगणात कापणी करून आणलेल्या भाताच्या पेंढ्याची गोलाकार रचलेली रास, गाई-गुरांचे गोठे, नुकतीच कापणी होऊन रिकामी झालेली भातखाचरे, त्यात उरलासुरला दाणा टिपण्यासाठी चिमण्या-पाखरांची उडालेली झुंबड... असा हा नयनभरा निसर्ग आपल्यासोबत नयला पारडी, भामटी, पालहीत, दमणवाडा, जुंप्री, दमण-कॅम्पपर्यंत येतो. दमणचे चेकपोस्टही अतिशय सुंदर आहे. प्रवेशद्वाराच्या मधोमध लंगोटी नेसलेला, अंगात बिनबाह्याची बंडी, डोळ्यांवर गोंडेदार कानटोपी, उजव्या खांद्यावर टोपलीत ठेवलेले पापलेट, सरंगा माशांची कावड तर डाव्या हातात भला मोठा सुरमई मासा असा हा कोळीदादा हसतमुख चेहऱ्याने आपले स्वागत करण्यासाठी उभा आहे. या प्रवेशद्वाराची पुनर्बांधणी १९ डिसेंबर १९९७ साली करण्यात आली.

दमण कॅम्पला लागूनच दमणचा सुप्रसिद्ध किल्ला आहे. ठाणे-पारडीवरून डांबरी सडक येथे आल्यावर दुभंगते. उजव्या बाजूचा रस्ता किल्ल्याला वळसा मारून पलीकडील नानी दमणला जातो, तर आपल्यासमोरील रस्ता थेट मोटी दमण किल्ल्यात जातो, मध्ययुगीन काळात पोर्तुगीजांचा सर्व कारभार दमणच्या किल्ल्यातून होई आणि आजही अनेक सरकारी कचेऱ्या मोटी दमण किल्ल्यात आहेत. मोटीदमण म्हणजे मोठा दमण. गुजरातमध्ये मोठ्याला मोटी आणि लहानाला नानी दमण असे म्हणतात. या किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम आहे. एक-दोन इमारतींचा अपवाद करता तीन-साडेतीनशे वर्षांच्या इमारती नुसत्या उभ्या नाहीत तर त्यात आजतागायत राबता आहे. त्यात चर्च आहेत. रुग्णालये आहेत, शाळा-कॉलेज आहे, कलेक्टर ऑफिस, नगरपालिका कार्यालय, प्रदूषण नियंत्रण कार्यालय, म्युझियम, बगीचे या सर्वांसाठी वीज, रस्ते, पाणी यांची मुबलक सोय आहे. दुकाने, हॉटेलही आहेत. इथे शहरात किल्ला नसून किल्ल्यात शहर आहे. तो पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. तीन हजार चौरस मीटर लांबीची तटबंदी, त्यामध्ये तोफा बंदुकातून मारा करता यावा, यासाठी मोक्याच्या ठिकाणी लहानमोठ्या जंग्या, चर्या, तटबंदीला भक्कम आधार मिळावा यासाठी मजबूत असे प्रचंड दहा बुरुज आणि दक्षिण व उत्तर दिशेला भव्य बुलंद असे दोन प्रवेशद्वार पाहिल्यावर या किल्ल्याची अभेदता लक्षात येते. आपल्या पायाखालची रुंद, डांबरी सडक प्रवेशद्वारातून आत जाते, त्यावरून कार, मोटार, घोडागाडी, मोटारसायकल, रिक्षा इत्यादी वाहनांची ये-जा सुरू असते. प्रवेशद्वाराला लोखंडी पट्ट्यांवर मोठे टोकदार खिळे आहेत, त्या खिळ्यांच्या मध्ये वरच्या बाजूला लांब रुंद, लोखंडी पाट्यावर AOS 5 DMAIO DE 1789 ROZESTA PORTA असे उठावदार अक्षरात लिहिले आहे. प्रवेशद्वाराच्या वर मधोमथ नक्षीदार गवाक्ष असून तो सध्या बंद करण्यात आला आहे. त्याच्या उजव्या बाजूला पोर्तुगीज राजचिन्ह व डाव्या बाजूला पृथ्वी असून गवाक्षाच्या वर शिलालेख आहे. त्यावर इ. स. १५८१ व १५८४ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद केली आहे. पण किल्ला बांधण्यापूर्वी दमणच्या बंदरावर गुजरातच्या शहाचा अंमल होता. इ. स. १५२३ साली पोर्तुगीजांनी शहाकडे व्यापार करण्याची परवानगी मागितली होती. शहाशी बिनसल्यावर इ. स. १५२९ साली पोर्तृगीजांनी बंदरावर पहिला हल्ला केला, बंदराच्या रक्षणासाठी शहाने दमणला किल्ला बांधला होता. पोर्तुगीजांनी इ. स. १५२९ ते १५५९ पर्यंत अनेकवार हल्ले केले. शेवटी गोव्याचा गव्हर्नर कॉन्स्टेटिनो डी. ब्रगांझा (इ. स. १५५८-१५६१) याने सुमारे ३००० सैनिक आणि १०० युद्धनौकांसह दमणवर हल्ला केला, पण यावेळी त्याला विरोध करायला कोणी नव्हते. पोर्तुगीजांच्या भीतीने लोक दमण सोडून गेले होते. त्यामुळे बंदर आणि किल्ला आयताच एकही सैनिक न गमवता पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. गव्हर्नर ब्रगांझाने शहाचा दमणचा किल्ला पाडून त्याजागी नवीन किल्ला बांधावयास घेतला. गोव्याला जाण्यापूर्वी त्याने बंदर आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी कप्तान दियागो द नऱ्होना मेजर ऑफ दमण याची नियुक्ती करून त्याच्या हाताखाली १२०० सैनिक दिले. इ. स. १५८४ला किल्ला बांधून झाल्यापासून ते १९६१च्या गोवा मुक्ती संग्रामापर्यंत पोर्तुगीजांनी किल्ल्याची दुरुस्ती-देखभालीची व्यवस्था चोख ठेवल्याने आज मोटी दमणचा किल्ला आधुनिकता आणि ऐतिहासिक संदर्भासह आपले सौंदर्य जपत मोठ्या रुबाबाने पर्यटकांना सामोरे जातो आहे.

दमण किल्ल्यात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला नगरपालिकेचे कार्यालय आहे. त्यापुढे सुंदर बगीचा असून त्यापलीकडे होली जीसस् (बॉम जेसू) चर्च आहे. हे चर्च इ. स. १६०३ ते १६०६च्या दरम्यान बांधण्यात आले. भारतीय पुरातत्त्व खात्याने त्याला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले असून बॉम जेसू चर्चच्या प्रवेशद्वाराजवळ तसा सूचनाफलक लावला आहे. आतील कलाकुसर केलेले लाकडी कोरीव काम खास पाहण्यासारखे आहे. येथे 'अवर लेडी ऑफ रोझरी, अवर लेडी ऑफ अॅग्यूसीस, संत बॉम जेसू, संत अँथोनी, संत तायगो', इत्यादी संतांचे पुतळे आहेत. जानेवारीमध्ये येथे मोठा उत्सव भरतो, तेव्हा देशोदेशीचे ख्रिस्ती बांधव आवर्जून येथे येतात.

किल्ल्यात एक पडकी इमारत आहे. इ. स. १७व्या शतकात तिचे बांधकाम करण्यात आले होते. ही इमारत म्हणजे कॅथलिकांचे मोठे विद्यापीठ होते. संत डॉमिनिकन मॉनसेटरी असे विद्यापीठाचे नाव होते. देशोदेशीचे विद्यार्थी येथे पदवीधर झाले. १९६१च्या गोवा मुक्ती आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी पोर्तुगीज फौजांनी या विद्यापीठात तळ ठोकला होता. गोवा मुक्ती आंदोलनात ठाणेकरांचाही सहभाग होता. ठाण्यात गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली. समितीचे नेतृत्व दत्ताजी ताम्हाणे, द. दा. काळे, वि. मा. जोशी इत्यादींनी केले. त्यानुसार अॅड. नारायण टिळक यांच्या नेतृत्वाखाली ८० सत्याग्रहींनी दमणच्या हद्दीत शिरावयाचे ठरविले. या तुकडीत जव्हारचे रेवजी चौधरी, कृष्णा खंडु चौधरी, राम जागळे, भास्कर बापट, वेसाव्याचे भालचंद्र तेरेकर, रंगनाथ कुलकर्णी, लक्ष्मीकांत किर्तने यांचा समावेश होता. १४ ऑगस्ट १९५५ रोजी सत्याग्रही दमणनजीक पाली-करंबोली येथे जमले. ठाणे जिल्ह्याचे नेते भाऊसाहेब वर्तक, पा. शि. देशमुख, दत्ताजी ताम्हाणे, प्रा. सदानंद वर्टी यांनी सत्याग्रहींना मार्गदर्शन केले. या तुकडीने दमण शहराच्या १६व्या क्रमांकाच्या दरवाजातून प्रवेश करण्याचे ठरले. सरहद्द ओलांडल्यावर काय होणार, याची कल्पना सत्याग्रहींना होती. दाभेळजवळ भारतीय सरहद्दीवरून सुमारे दीड किमी आत सत्याग्रही येताच पोर्तुगीजांनी गोळीबार सुरू केला. साधु रामगिरीसमवेत आठ सत्याग्रही धारातीर्थ पडले. या दु:खद घटनेनंतर आणखी सत्याग्रही पाठवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे नेत्यांनी सत्याग्रह सामंजस रूपाने मागे घेण्याचे ठरविले. पोर्तुगीजांच्या हेकट जुलमी राजवटीविरुद्ध गोवेकर जनतेने सुरू केलेल्या गोवा मुक्ती संग्रामाला ठाणे, मुंबई-महाराष्ट्रासह गुजराती बांधवही सामील झाले. हा लढा १९६१पर्यंत अधिकच तीव्र करण्यात आला. परिणामी १९ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारने आपल्या फौजा गोवा व दमण प्रांतात पाठवल्या. दमणमधल्या पोर्तुगीज सैन्याने मोटी दमणमधल्या डॉमिनिकन कॉलेज व नानी दमणच्या सेंट जेरोम किल्ल्यातून भारतीय सैन्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फ्रीडम फायटर मराठा रेजिमेंटने बॉम्बहल्ल्याने डॉमिनिकन कॉलेजसह लपण्याच्या सर्व जागा उद्ध्वस्त केल्या व पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले आणि ४५० वर्षांची पोर्तुगीज राजवट संपुष्टात आणली. यात दमणच्या किल्ल्यातील कारवाईत मराठा रेजिमेंटने अतुल कामगिरी केली, त्याचे स्मारक मोटी दमण किल्ल्यात उभारण्यात आले आहे.

किल्ल्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर जेटी आहे. मध्ययुगात समुद्राकडून येणारा हाच राजमार्ग होता. त्यामुळे येथे अनेकदा चकमकी झडल्या आहेत. इ. स. १७३९ साली चिमाजी आप्पांच्या मराठी फौजांनीही या किल्ल्याला वेढा घातला होता. मोटी दमणने आपला ऐतिहासिक वारसा व सांस्कृतिक इतिहास जतन करताना आधुनिकतेचीही कास धरली आहे. त्यासाठी किल्ल्यातील या शहराला ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यायला हवी. त्या निमित्ताने मराठा ब्रिगेड व शहीद सत्याग्रहींचे पुण्यस्मरण होईल.

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.