Amaravatichi Ambadevi story in marathi
महती देवीची : अमरावतीची अंबादेवी
येथील अंबादेवी मंदिराला पुरातन इतिहास आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणी हरणाशी जोडला जातो. राज्यातीलच नव्हे तर, इतर प्रांतातील भक्तांची मांदियाळी नवरात्रोत्सवात पहायला मिळते. या मंदिराजवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिरांना आता नवा साज चढला आहे.
या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीचे असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. अंबामातेचे प्राचीन मंदिराचा कळस उंचावर होता तेव्हा तो स्पष्ट दिसायचा. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वऱ्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदू मंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यात अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अनेक वर्षे हे मंदिर लहानशा ओटय़ावर चार लाकडी खांबाचा आधार घेऊन उभे होते. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहल्यादेवी होळकरांनीही या मंदिराच्या उभारणीत योगदान दिल्याचे पुरावे मिळतात. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मुर्तीवर सुवर्णखचित दागिने चढवले जातात. मुखवटा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगडय़ा आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.
अंबादेवी मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा अलीकडेच विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मंदिराचा कळस सुवर्णाचा असून शिखरही कलाकुसरीचे अप्रतिम दर्शन घडवते. एकवीरादेवीचे मंदिर जनार्दनस्वामी यांनी उभारल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. एकवीरा देवीच्या गाभारा कोरीव व दगडाने बांधलेला आहे. पुरातन नमुना यात स्पष्ट दिसून येतो. देवालय लाकडी चौकटीवर बांधलेले आहे. एकवीरा व अंबादेवीच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मंदिरात जाऊन सहज दर्शन घेता येते.

No comments:
Post a Comment
Please do write your suggestions and thoughts.